ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पंतप्रधानांचे जनतेला संदेश देणारे भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणामध्ये त्यांच्यावर विविध अंगांनी सुरू असलेल्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काही अंशी विचार केला तर हे भाषण सकारात्मक असण्याऐवजी खुलासे करणारे ठरले. अन्यथा पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी केलेल्या पहिल्या तीन भाषणांमध्ये नवनव्या घोषणांचा वर्षाव होता. एका अर्थाने त्यांची ती भाषणे प्रो-ऍक्टीव्ह होती. आताही झालेले भाषण तसे संरक्षणात्मक नव्हते. ते खुलासे करणारे होते आणि ते भाषण म्हणजेच त्यांच्यावर होणार्या टीकेची प्रतिक्रिया होती. मात्र ही प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी ती आक्रमक शब्दात व्यक्त केली. त्यांनी खुलासे केले असले तरी एका अर्थाने ते आपल्यावर टीकेला दिलेले सडेतोड उत्तरसुध्दा होते. ते कसेही असले तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून पंतप्रधानांचे १५ ऑगस्टचे भाषण हे चर्चेचा विषय झालेले आहे. त्यात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव जाणवतो आणि जनतेसाठी नवनव्या कल्पक योजना कल्पकतापूर्ण शब्दात मांडण्याचे त्यांचे कसबही या चर्चेचा विषय होण्यामागे असते.

पंतप्रधानांनी यावेळी थोडक्यात भाषण केले. यापूर्वी त्यांनी लांबलचक भाषणे केली होती. गेल्यावर्षी तर त्यांचे भाषण ९६ मिनिटे झाले होते. या पूर्वीच्या कोणत्याही पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून एवढी लांबलचक भाषणे केलेली नव्हती. याबाबतीत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम होता आणि तोही केवळ ७२ मिनिटांचा होता. तो विक्रम मोडून मोदींनी एकेवर्षी ९६ मिनिटे तर २०१५ साली ८६ मिनिटे भाषण केले. विशेष म्हणजे ही भाषणे करताना मोदींनी हातात कागद धरलेला नव्हता. आपले जे काही भाषण करायचे आहे ते त्यांनी आपल्या स्मरणाच्या आधारावर केलेले होते. गेल्या महिन्यात झालेल्या त्यांच्या मन की बात कार्यक्रमात यावेळी आपण लहान भाषण करणार