ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

थाळी नाद आंदोलन करून राष्ट्रवादीने केला सरकारचा निषेध

नागपूर, दि. २८ - महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतमालाच्या भावाकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने थाळी नाद आंदोलन करून राज्य सरकारचा निषेध केला. दिवाळीपूर्वी अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात आणल्या नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशाराही या वेळी देण्यात आला.

 

माजी मंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. भाजप सत्तेवर येताच अन्नधान्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाली. डाळीचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, असे असतानाही राज्य शासन कुठलीच उपाययोजना करीत नाही. सरकाचे प्रशासनवर नियंत्रण राहिले नसल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्याच्या निवारणासाठी फक्त घोषणा केल्या जात आहे. प्रत्यक्षात कुठलीच मदत देण्यात आलेली नाही.

 

कापूस, सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र, त्याची कुठलीच दखल घेतल्या जात नाही. कर्जाच्या परतफेडीने समस्या सुटणार नसल्याचे सांगून वेळ मारून नेले जात आहे. दिवाळी जवळ येऊन ठेपली आहे


राज्य शासनाने सर्वसामान्यांसाठी जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करावी, सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून धान्याचा पुरवठा करावा, साठेबाजांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करून अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले