ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पालकमंत्र्यांच्या हस्ते सातारा-तुकूम रस्त्याचे लोकार्पण

रस्त्यावर 2 कोटी 18 लाखाचा खर्च; जिल्ह्यातील रस्ते चांगले बनविणार
चंद्रपूर, दि. 26 (प्रतिनिधी)- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आलेल्या सातारा-तुकूम मार्गाचे लोकार्पण करण्यात आले. या रस्त्यावर 2 कोटी 18 लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्या अल्का आत्राम, बांधकामचे अधीक्षक अभियंता डी.के.बालपांडे, उपविभागीय अधिकारी सीमा अहीरे, सरपंच कविता मडावी आदी उपस्थित होते.  राज्यमार्ग 318 ते कोसारा-सोईट-वरोरा-मोहर्ली-चंद्रपुर-जुनोना-गिलबिली-पोंभूर्णा-नवेगाव मोरे ते प्ररामा 9 रस्त्यांचे सदर काम करण्यात आले असून 2 कोटी 18 लक्ष रुपये या कामावर खर्च करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रस्ते मजबूत बनविण्याचे काम सुरु असून गेल्या 1 वर्षात 272 कोटी रूपये जिल्ह्यातील रस्त्यांच्या बांधकामासाठी देण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत 100 किलोमीटरची रस्त्याची कामे विशेष बाब म्हणून जिल्ह्यात मंजूर करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
(सौजन्य- महान्यूज)