ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पोरगव्हाण येथील जलयुक्त शिवार कामांची जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी

अमरावती, दि. 28 (प्रतिनिधी)- जलयुक्त शिवार अभियानाला गती देण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. वरुड तालुक्यातील पोरगव्हाण या गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विविध कामांची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर एकदरा गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी उपविभागीय अधिकारी ललितकुमार वर्‍हाडे, वरूडचे तहसीलदार आशिष बिजवल, गटविकास अधिकारी बोपटे, जि.प.सभापती गिरीश कराड, एकदराचे सरपंच रामभाऊ गायधणे आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकार्‍यांनी पोरगव्हाण येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍याची पाहणी केली. या गावात लोकसहभागातून जलसंधारण, विहिर पुनर्भरण, पांदण रस्ते, आरोग्य सुविधा, स्वच्छतेची कामे, महिला सबलीकरण, बेरोजगारांना रोजगार आदी सर्व कामांचे नियोजन करण्यात आले असुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ही कामे करण्यात येणार आहेत.
वरुड तालुक्यातील मौजे पोरगव्हाण हे गाव सन 2016-17 च्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये समाविष्ट असून या गावची लोकसंख्या 750 आहे. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्येही या गावाने सहभाग घेतला आहे. गावाला लागून असलेल्या टेकडीवर माथा ते पायथा या सुत्रानुसार माथ्यापासून ते पायथ्यापर्यंत जलसंधारणाची कामे घेतली आहेत. पठारावर गावतळे घेण्यात आले असून खाली सलग समतल चर ही कामे लोकसहभागातून करण्यात आली आहे. 
वरुड तालुक्यातील एकदरा गावास भेट देवून जिल्हाधिकारी गित्ते यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तेथे घेण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍याच्या कामाची पाहणी केली. एकदरा हे गाव वरुड तालुक्यातील शेवटचे गाव आहे. वर्धा नदीच्या काठावर डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. या गावात वर्धा नदीवर एक कोल्हापुरी बंधारा पुर्वी बांधण्यात आला होता तो जीर्ण झाला असून त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमनेर प्राथमिक केंद्रालाही जिल्हाधिकार्‍यांनी भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली.