ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गाढवावरुन वरात

>> पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नवी दिल्ली, दि. २५ - उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सर्वच राजकीय पक्षांच्या हलचाली आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. काहीजण तिकीट न मिळाल्याने नाराज आहेत. तर अनेकजण तिकिटासाठी नेत्यांजवळ लॉबिंग करत आहे. अशातच एक रंजक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी एका उमेदवाराने चक्क गाढवावरुन आपली वरात काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, नोएडामधील ३५  वर्षीय देवराम प्रजापती यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत:ची चक्क गाढवावरुन वरात काढली. पण ही वरात त्यांच्या चांगल्याच अंगलट आली आहे. कारण मंगळवारी त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘प्रीव्हेंशन ऑफ अॅनिमल क्रुअॅलिटी अॅक्ट’अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

प्रजापती आगामी उत्तर प्रदेशची निवडणूक अपक्ष म्हणून लढत असून, सोमवारी त्यांनी गाढवावरुन वरात काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, ”आमचे पूर्वज गाढवांची देखभाल करत. गाढव हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा एक भाग होता. गाढवांनी आमच्यासाठी ओझी वाहिली. त्यामुळे त्यांना आम्ही कधीही चुकीची वागणूक दिली नाही.” असं सांगितलंय.

दरम्यान, त्यांनी गाढवावरुनच लोकसभेपर्यंतचा प्रवास पूर्ण करणार असून, याद्वारे आपल्या समाजाच्या दुरावस्थेकडे सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.