ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

यांचा पक्ष जिंकला तर गाढव होणार मुख्यमंत्री

लखनौ, दि. ३० - बहुजन विकास पार्टीने येत्या निवडणुकीत आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून चक्क एका गाढवाला पुढे केले आहे. याचे नावही ठेवण्यात आले आहे. गदर्भ सिंह यादव हे या पक्षाचे भावी मुख्यमंत्री असणार आहेत.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केशव चंद्र यांनी या बाबत माहिती दिली की, भ्रष्ट, अयोग्य उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी देणाऱ्या निवडणूक व्यवस्थेविरोधात आम्ही लढत आहोत. आमच्यासाठी गाढव हा सर्वात योग्य उमेदवार आहे. कारण गाढव कामाला ओझे समजत नाही आणि त्याला कायदा करण्यासाठी कोणत्याही शिक्षणाची गरज नाही. संस्कृतमध्ये गदर्भ म्हणजे गाढव. म्हणून या गाढवाला गदर्भ सिंह यादव असे नाव दिले आहे. 

केशव चंद्र यांनी यापूर्वी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. दोन्ही वेळा त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी बहुजन विकास पार्टीची स्थापना केली. या पक्षाचे निवडणूक चिन्ह चप्पल आहे.