ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

महापालिकेच्या 128 जागांसाठी 1358 उमेदवार


पिंपरी, दि. 5 (न्यूज मेट्रो) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी 128 जागांसाठी 1358 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे छाननीनंतर स्पष्ट झाले आहे.

छाननी दरम्यान एकुण 143 उमेदवारी अर्ज बाज झाले असून त्यामध्ये त्यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक व अजमेरा- नेहरूनगर प्रभागातील उमेदवार सदगुरु  कदम, माजी उपमहापौर व राष्ट्रवादीच्या नगरसेविका झामाबाई बारणे, मनसेचे उमेदवार शशी राजेगावकर या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. मंगळवारी (दि. 7) दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. मुदतीमध्ये कोण-कोण माघार घेणार त्यानंतर निवडणुकीच चित्र स्पष्ट होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावयाची मुदत शुक्रवार दि. 3 रोजी संपुष्टात आली. निवडणूक लढवू इच्छिणार्‍या 1501 जणांनी 128 जागांसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दाखल उमेदवारी अर्जांची शनिवारी दि. 4 रोजी छाननी पार पडली. छाननीदरम्यान एकुण 143 उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले तर 1358 अर्ज वैध ठरले आहेत.

आता सोमवारपासून (दि. 6) अर्ज माघार घेण्यास सुरूवात होणार आहे. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांना मंगळवारी (दि. 7) दुपारी तीन वाजेपर्यंत आपला अर्ज मागे घेता येणार आहेत. बंडखोरी रोखण्यासाठी पुढील दोन दिवस राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. मंगळवारी दुपारी दोन नंतर शहरातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असून बुधवार दि. 8 रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे.