ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

भाजपच्या यादीत 'आयातरावां'चा भरणा

भाजपच्या यादीत 'आयातरावां'चा भरणा
- निष्ठावंतांना मारले फाट्यावर
- तिन्ही मतदार संघात शह-कटशह
- 'आरएसएस'चा आदेशही धाब्यावर
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून १२८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.  भाजपच्या निष्ठावंताना डावलण्यात आले असताना आयातरावांचा भरणा यादीमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) शिफारस केलेल्या काही पदाधिकाऱ्यांनाही यादीत थारा मिळाला नाही. तिन्ही मतदार संघामध्ये शह-कटशहाचे राजकारण रंगले. भाजपच्या निष्ठावंतांऐवजी आयारामांचा यादी तयार करताना वरचष्मा राहिल्याने भाजपचा सामान्य कार्यकर्ता दुखावला आहे. 

महापालिकेच्या १२८ जागांसाठी काल (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस होता. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपमध्ये एबी फॉर्म वाटपाचा घोळ सुरु होता. खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्यात उमेदवारांची नावे निश्चित करण्यावरुन कुरघोडी सुरु होती. इंद्रायणीनगर प्रभागात महेश लांडगे यांच्या नाकावर टिच्चून आमदार जगताप यांचा ब्रेन म्हणून ओळखले जाणारे सारंग कामतेकर आणि नगरसेविका सिमा सावळे यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे याठिकाणी महेश लांडगे यांचे निष्ठावंत असलेले तुषार सहाणे यांना डावलण्यात आल्याने अखेरच्या क्षणी सहाणे यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये भाजयुमोचे शहराध्यक्ष रवी लांडगे वगळता इतर सर्व निष्ठावंतांना फाट्यावर मारण्यात आले. भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शैला मोळक यांनाचाही पत्ता कापत त्याठिकाणी महेश लांडगे समर्थक एका नवख्या कार्यकर्त्याच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याने भोसरीमध्ये नाराजीचा सूर आहे. 

माजी नगरसेवक तसेच भाजयुमोचे माजी शहराध्यक्ष राजु दुर्गे यांच्या कन्या तेजस्वीनी दुर्गे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, राजु दुर्गे यांना डावलण्यात आल्याने ते नाराज आहे. नगरसेवक प्रमोद ताम्हणकर यांचेही तिकीट कापण्यात आले.  खासदार अमर साबळे यांच्या कन्या वेणू साबळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आरएसएस‌च्या मुशीत तयार झालेले भाजप शहर सरचिटणीस अमोल थोरात, माजी ॲड. मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी यांनाही कात्रजचा घाट दाखविण्यात आल्याने आरएसएसला धक्का बसला आहे. माजी नगरसेवक माऊली थोरात, रघुनंदन घुले यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली. भाजपच्या यादीमध्ये ८० टक्के आयात उमेदवारांचा भरणा आहे. त्यामुळे भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. किवळे येथे प्रभाग क्रमांक १६ मधील भाजप कार्यकर्ते दिलीप परदेशी यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांनी भाजपची पत्रके जाळत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.  

निष्ठावंतांना बुरे दिन - ॲड. मोरेश्वर शेडगे
याबाबत भाजपचे चिंचवडगावातील इच्छुक तसेच निष्ठावंत कार्यकर्ते ॲड. मोरेश्वर शेडगे म्हणाले की, माझं काय चुकलं, हेच मला समजले नाही. माझ्या वडिलांनी उभे आयुष्य पक्षासाठी वेचले. आमच्या घरातील तिसरी पिढी भाजपचे काम करत आहे. मी स्वतः पंधरा वर्षापासून जीव तोडून काम करत आहे. मात्र, मी कुठे कमी पडलो. माझं काय चुकलं हेच मला समजत नाही. पक्षाच्या पडत्या काळात कार्यक्रम, आंदोलनाच्या माध्यमातून पक्ष जिवंत ठेवला. आज पक्षाला अच्छे दिन आले पण निष्ठावंतांना बुरे दिन आले आहेत, अशी नाराजी ‌त्यांनी बोलून दाखविली.