ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

काँग्रेसच्या आडमुठ्या धोरणामुळे सोलापुरातील आघाडीत बिघाडी

सोलापुर, दि. 6 - सोलापूर महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची बोलणी निश्चित झाल्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या आडमुठ्या धोरणामुळे आघाडी फिस्कटली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी घेतलेली सांमजस्य भूमिकाही आघाडी वाचवू शकली नाही.
सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी निवडणूक होत आहे. महापालिकेच्या सत्तेपासून शिवसेना आणि भाजपाला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसने आघाडी करावी, असे पवार व शिंदे यांनी बजावले होते. त्यासाठी दोन्ही काँग्रेसने जागा वाटपासाठी चर्चा करण्यासाठी प्रत्येकी समन्वय समिती गठित केली होती. या समित्यांच्या पाच-सहावेळा बैठका झाल्या मात्र निर्णय झाला नाही.

राष्ट्रवादीकडे चाळीस ताकदीचे उमेदवार असल्यामुळे त्यांनी चाळी जागांवर दावा केला होता. मात्र काँग्रेसच्या आग्रहामुळे तो तीस पर्यंत आणण्यात आला. त्यामुळे होणार हे जवळजवळ स्पष्ट झाले होते. मात्र, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा स्वतःचा शहर मध्ये विधानसभा मतदारसंघ अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रवादीवर अटी लादणे सुरू झाले. महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या 16 आहे. त्यापैकी 11 नगरसेवक शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील आहेत. परंतू या विद्यमान 11 जागांपैकी 6 जागांवर राष्ट्रवादीने पाणी सोडावे, आणि उर्वरित 5 जागांवर समाधान मानावे, असा अव्यवहार्य अट्टाहास काँग्रेसने केला. हा अट्टाहास मान्य करणे राष्ट्रवादीला कदापि शक्य नव्हते. त्यामुळे याच मुद्दयावरून आघाडी न करता स्वतंत्र लढण्यास दोन्ही पक्षांनी प्राधान्य दिले.