ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

… तर दिल्लीचे तख्त उखडून टाकीन – लालूप्रसाद यादव

पाटणा, दि. १९ - मी कोणत्याही परिस्थितीत असलो तरी हरकत नाही. मला धमकावण्याचे धाडस कराल; तर तुम्हालाच दिल्लीच्या तख्तावरून उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही; अशा शब्दात राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दरडावले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या कान उघाडणीनंतर हजार कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्तेसंदर्भात आयकर अधिकाऱ्यांनी लालू यांच्याशी संबंधित २२ ठिकाणी छापेमारी केली. मात्र लालू यांनी हा केंद्र शासनाचा आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप लालूंनी केला आहे. आपल्यावर राजकीय सूड उगविण्यासाठी सरकार शासकीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा त्यांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर लालूंनी सरकारवर नवा हल्लाबोल केला आहे.

लालू यांच्याशी संबंधित आस्थापनांवर आयकर विभागाच्या धाडी पडण्यापूर्वी बिहारमधील लालूंचे साथीदार असलेले मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी; आमच्या साथीदाराच्या विरोधात सबळ पुरावे असल्यास भाजप आणि सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी; असे जाहीर विधान केले होते. धाडी पडल्यानंतर लालूंनी भाजपाला त्यांच्या आघाडीत नवा साथीदार मिळाल्याबद्दल अभिनंदन करून नितीश यांच्यावर निशाणा साधल्याने विहारमधील युती तुटण्याच्या चर्चेच्या वादळाने राजकीय क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले. मात्र त्याच वेळी लालूंनी; आपल्यावर कितीही संकटे आली तरी प्राणपणाने जातीयवाद्यांशी लढत राहू; अशी ग्वाहीही ट्विटर द्वारे दिली.

मात्र, त्यानंतर अल्पावधीतच; ‘तोंडाला जास्त पाणी सुटू देऊ नका. बिहारची सत्ताधारी आघाडी अभेद्य आहे. आणखी समविचारी पक्षांना सोबत घ्यायचे आहे. आपण भाजप आणि आरएसएसला घाबरत नाही. उलट भाजप आणि संघाला आपल्या नावानेच धडकी भरते;’ असे ट्विट केले. आता नव्या ट्विटने लालूंनी संघ आणि भाजपाला नव्याने धमकावले आहे.