ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

जैन इरिगेशनला पाच लाख सौर कृषिपंपांची जागतिक निविदा

नाशिक, दि. ५ (प्रतिनिधी) - जैन इरिगेशनला राज्य सरकारची जगातील सर्वात मोठी अशी ४७३ कोटी रुपयांची सोलर कृषी पंपाची ऑर्डर बहाल करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. च्या वतीने राज्याच्या विविध भागात ८ हजार ९५९ कृषीपंपाचा पुरवठा व त्याचे इन्स्टॉलेशन जैन इरिगेशन करणार आहे. 

नैसर्गिक संसाधनाच्या संतुलनाचा व राज्यात उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाच्या मुबलक उपलब्धतेचा पूरेपूर वापर कृषीक्षेत्रासाठी सोलरपंपाच्या माध्यमातून करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने अभूतपूर्व ५ लाख सोलर कृषी पंप बसवण्याचा निर्धार केला आहे. जगातला हा सर्वात मोठा सौर कृषी पंपाचा प्रकल्प असून तो महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी  राबविणार आहे. 

ही निवीदा प्रक्रीया कंपनीच्या सूक्ष्म सिंचन विभागाद्वारे संचलित केली असून, यात भविष्यात शेतकर्‍यांना वैयक्तिक पातळीवर सूक्ष्म सिंचन प्रणाली विक्रीची संधी जैन इरिगेशनला उपलब्ध झाली आहे. सदर प्रकल्पाच्या कामासाठी एकूण १४ टेंडर आले होते. यात सर्वाधिक काम, गुणवत्ता, या क्षेत्रातील भक्कम अनुभव व शासनाच्या अटी व शर्तीच्या पूर्तीनूसार जैन इरिगेशनला मिळाले आहे. 

जैन इरिगेशनने सोलर कृषीपंपाच्या क्षेत्रात मागील अनेक वर्ष सातत्य ठेऊन संशोधनात मोठे यश साध्य केले. या संशोधनाच्या बळावर जगात सर्वप्रथम डीसी सोलर कृषीपंपाची निर्मिती केली. या साठी लागणारे सोलार पॅनल, कंट्रोलर्स, पंपस्, स्क्रीनपाईपस्, केसींगपाईपस्, ङ्गिल्टर्स आदि सर्व प्रणाली जैन इरिगेशन स्वतःच निर्मिती करते. या क्षेत्रातील सर्व साहित्याच्या उत्तम निर्मितीचा दांडगा अनुभव कंपनीच्या पाठीशी आहे.

मागील काहीवर्षात कंपनीने भारतभर ९ राज्यात सुमारे १५ हजारपेक्षा अधिक सोलर कृषी पंप लावून ते कार्यान्वित केले आहेत. एकट्या जैन इरिगेशनने हा वाटा ५० टक्के आपल्या कडे राखण्यात यश मिळवीले. महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात वीस जिल्ह्यांचा समावेश असून यात सर्वाधिक दूष्काळग्रस्त क्षेत्राचा समावेश आहे. बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातही विविध भाग यात आहेत.