ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

विरोधात असताना आम्ही देखील कर्जमाफीची मागणी करायचो – गडकरी

नागपूर, दि. २९ - राज्यातील विरोधी पक्ष, शेतकरी संघटना शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी आक्रमक होत असताना केंद्रीय नेते नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी शक्य नसल्याचे म्हटले आहे. कर्जमाफी यापूर्वी झाली होती, पण त्याने प्रश्न सुटला नसल्याचे नितीन गडकरी यांनी नमूद केले. विरोधक नितीन गडकरी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीची मागणी विरोधक फक्त करतात, विरोधात आम्ही देखील असताना हीच मागणी करायचो अशी कबुलीही त्यांनी दिली आहे. विदर्भात जोपर्यंत ५० टक्के सिंचनाची व्यवस्था होत नाही तोवर शेतकरी आत्महत्या रोखणे कठीण असल्याचेही गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी काही पत्रकारांना आमंत्रित केले होते. गडकरी यांना पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना कर्जमाफीचा प्रश्न विचारण्यात आला. विरोधक कर्जमाफीची मागणी करत असताना तुमची भूमिका काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर गडकरी म्हणाले, कर्जमाफीने प्रश्न सुटत नाही.