ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाजप ही भारताची अनुत्पादक मालमत्ता – अभिषेक सिंघवी

नवी दिल्ली, दि. ३ (वृत्तसंस्था) - भारतीय जनता पक्ष हि भारताची अनुत्पादक मालमत्ता असून मोदी सरकार आणि त्यांच्या प्रशासनाला देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर कशी आणायची याबाबत तसूभरही जाणीव नाही; अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिघवी यांनी सत्ताधारी पक्ष आणि मोदी सरकार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

सन २०१६- १७ या आर्थिक वर्षात शेवटच्या तिमाहीमध्ये आर्थिक परिस्थितीची गती मंदावण्याला नोटबंदीच्या निर्णयाला सर्वस्वी कारणीभूत ठरविणे अयोग्य ठरेल; असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सिंघवी यांनी त्यांच्या या विधानावर कठोर टीका केली आहे. सरकारचे हे स्पष्टीकरण म्हणजे त्याचे गोधळलेपण, विकलता, ढोंगीपणा, भित्रेपणा आणि वैचारीक दिवाळखोरी यांचे निदर्शक आहे; असे ते म्हणाले.

मेक इन इंडियाचासिंह डरकाळ्या ,मारण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात त्याची म्याऊ म्याऊ सुरू आहे. व्यवसाय करणे सुलभ होण्याऐवजी ते अधिकाधिक दुर्लभ होत चालले आहे. सरकारने लाखो रोजगारनिर्मिती करण्याच्या मोठ्या वल्गना केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात तसे घडताना दिसून येत नाही. सरकारकडे कोणत्याही विशिष्ट प्रश्नाचे विशिष्ट उत्तर उपलब्ध नाही. भारताचा विकासदर . वर कसा पोहोचला याचे उत्तर या सरकारकडे आहे काय; असा सवालही सिंघवी यांनी केला. नोव्हेंबरपासून आतापर्यंत सरकार जे सांगत आले त्यापैकी काहीही प्रत्यक्षात आले नाही. त्यामुळे देशाच्या वाट्याला केवळ दु: आणि वेदना आल्या आहेत. सरकारला याबद्दल खेड वाटलं पाहिजे; असेही ते म्हणाले.