ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

प्रत्येक भारतीयाने हिंदू असल्याचा गर्व बाळगावा - योगी आदित्यनाथ

लखनौ, दि. ८ (वृत्तसंस्था) - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त लखनौ विद्यापीठात आयोजित केलेल्याहिंदवी स्वराज्य दिनकार्यक्रमात हिंदू ही प्रत्येक भारतीयाची ओळख असल्यामुळे प्रत्येक भारतीयाने हिंदू असल्याचा गर्व बाळगावा, पण संकोच बाळगू नये, असा सल्ला दिला आहे. हिंदू सनातन संस्कृतीचे अहिंसा, अभय आणि सत्य हे तीन प्रमुख आधारस्तंभ असल्याचेही त्यांनी सांगितले.

आदित्यनाथ यांनी यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणाचे उदाहरण दिले. त्यांना शिकागोमधील परिषदेत हिंदुत्त्वाबद्दल विचारले असता, ते मला हिंदू असल्याचा गर्व असल्याचे म्हणाले होते, असे आदित्यनाथ यांनी सांगितले. हिंदुत्त्वाचा मूळ हेतूसत्यम, शिवमसुंदरम्…’ हा असून हिंदू ही सत्याच्या सागरातील अमृत रसधारा आहे. तसेच अहिंसा, अभय आणि सत्य हे हिंदू सनातन संस्कृतीचे तीन आधारस्तंभ आहेत, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर राष्ट्रविरोधी मानसिकतेविरोधात संघर्षासाठी पुढे यावे, असे आवाहनही योगी आदित्यनाथ यांनी शिक्षकांसह विद्यार्थ्यांना केले.