ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

संघटनेच्या धोरणाच्या विपरीत सदाभाऊंचे वागणे – राजू शेट्टी

नाशिक, दि. ९ - खासदार राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील दरी वाढली असून भाजपच्या गराड्यात सदाभाऊ खोत भरकटले असल्यामुळे शेतकरी हिताकडे त्यांनी पाठ फिरवली असून शेतकऱ्यांच्या हिताविरूद्ध वर्तन करत आहेत, याचे दुःख वाटते. वेळ गेलेली नाही, जशी फडणवीसांची बाजू घेता तसे थोडे शेतकऱ्यांचेही पाहावे, असे म्हणत शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या हकालपट्टीचे संकेत दिले आहेत.

नाशिक येथे शेतकरी संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, सदाभाऊंचे वागणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धोरणाच्या विपरीत असून याबाबत माझ्याकडे येऊन अनेक कार्यकर्ते हे कसे घडले? अशी विचारणा करतात. राज्य कार्यकारीणीने देखील संघटनेचे विचार, धोरणाच्या अगदी विरुद्ध घेतलेल्या भूमिकेची गंभीर दखल घेतली आहे. त्याचा जाब लवकरच त्यांना विचारला जाईल, असे राजू शेट्टी म्हणाले.

राज्यात शेतकऱ्यांनी पुकारलेला संप हा उल्लेखनीय असल्याचे म्हणत हे एक ऐतिहासिक आंदोलन असल्याचे शेट्टी म्हणाले. ज्यांच्या राज्यात ही घटना घडली, शेतकऱ्यांवर ही वेळ आली त्यांनी आत्मपरिक्षण करावे असा सुचक सल्ला राजू शेट्टी यांनी भाजपला दिला. याबरोबर त्यांनी तरूण शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा सल्ला दिला.