ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिगटाची आपल्याला कल्पनाच नाही – रावते

औरंगाबाद, दि, १० - मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी स्थापन केलेल्या मंत्रिगटाची आपल्याला कल्पनाच नसल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्याला अंधार ठेवल्याचे रावते म्हणाल्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

शुक्रवारी आपले नियोजित दौरे रद्द करुन मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी शासकीय कामकाज केले. यावेळी भाजपच्या मंत्र्यांसोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचाही मंत्रिगटात समावेश केला. हा मंत्रिगट शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. मात्र या गटाबद्दल आपल्याला माहितीच नसल्याचे गौप्यस्फोट दिवाकर रावतेंनी केला.

कर्जमाफी आणि इतर प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय मंत्रिगटाची स्थापना केली आहे. या समितीचे प्रमुख महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे असतील. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, परिवहनमंत्री दिवाकर रावते समितीचे सदस्य असणार आहेत. उच्चस्तरीय मंत्रिगटानं सुकाणू समितीला चर्चेसाठी निमंत्रण दिलं आहे. तर सुकाणू समितीच्या सदस्यांनीही सरकारशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.