ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकऱ्यांना सरकार देणार दहा हजारांची उचल

मुंबई, दि. १३ - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच तातडीची मदत म्हणून १० हजार रुपयांची उचल देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. ही रक्कम त्वरित देण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना पीक लागवडीसाठी मदत होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. त्यानंतर १० हजारांची उचल देण्याचे मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निश्चित करण्यात आले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अशी मदत देण्यात यावी; अशी मागणी शिवसेनेचे आमदार राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. त्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली.

राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. भाजीपाला आणि दुधाच्या उत्पादन खर्चाइतकेही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी भाज्या आणि दूध रस्त्यावर टाकून दिले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीबरोबरच उचल देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.