ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

राष्ट्रपती पदासाठी लालकृष्ण अडवाणी हेच योग्य उमेदवार

नवी दिल्ली, दि. १४ (वृत्तसंस्था) - राष्ट्रपतीपदासाठी कोणाला उमेदवारी मिळणार हे भाजपने अद्याप गुलदस्त्यातच ठेवले आहे. तरीही राष्ट्रपतीपदासाठी अडवाणी यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आता तर लालकृष्ण अडवाणी हेच राष्ट्रपती पदासाठी योग्य अनुभवी उमेदवार असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटल्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

निवडणूक आयोगाकडून नुकताच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. राष्ट्रपती पदासाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागून आहे. दरम्यान अडवाणींना राष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळावी, असे ट्विटरवर शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. देश पक्षासाठी अडवाणी यांनी आपले सर्वस्व दिले असून राष्ट्रपती पदासाठी तेच योग्य उमेदवार आहेत. या शब्दांमध्ये सिन्हा यांनी अडवाणी यांचे समर्थन केले. अडवाणी हे देशासाठी काय करू शकतात हे दाखविण्याची संधी त्यांना कधीच मिळाली नाही. पंतप्रधान पदासाठी ते योग्य उमेदवार होते. तरीही त्यांना डावलण्यात आले, अशी खंतही सिन्हा यांनी व्यक्त केली.