ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दोंडाईचा घरकुल घोटाळ्याची चौकशी होणार

धुळे, दि. ५ (प्रतिनिधी) - दोंडाईचा नगरपालिकेने दलित आदिवासींसाठी राबविण्यात येणार्‍या केंद्रीय गृहनिर्माण योजनेंतर्गत कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार दलित मातंग आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी केली आहे. त्यामुळे त्याबाबतची चौकशी करण्यासाठी नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची चौकशीसाठी नियुक्ती नगरविकास विभागाने केली आहे. 

दरम्यान चौकशीला दि. ६ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दोंडाईचा नगरपालिकेच्या माध्यमातून दलित आदिवासींसाठी राबविण्यात येणार्‍या केंद्रीय गृहनिर्माण योजनेंतर्गत कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार दलित मातंग आदिवासी सेवा मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

तक्रारीची दखल घेवून नगरविकास विभागाने नाशिक महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची चौकशीसाठी नियुक्ती केली. त्याबाबतचा आदेश नगरविकास विभागाचे कक्षाधिकारी सुहास ममदापुरकर यांनी काढला आहे. 

गेडाम यांनी चौकशी करुन त्याबाबतचा अहवाल शासनाला द्यायचा आहे. त्यामुळे प्राथमिक चौकशी दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता नाशिक महापालिकेच्या मुख्यालय येथे होणार आहे. या चौकशीसाठी दोंडाईचा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गांगोडे आणि तक्रारदार यांना संबंधित कागदापत्रासह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.