ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कर्जमुक्तीला फाटा देण्यासाठी मध्यावधीचा घाट – उद्धव ठाकरे

शेगाव, दि. १५ - आम्ही मध्यावधीसाठी तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असून याला शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी पैसे नाहीत अशावेळी मध्यावधी निवडणुकीसाठी पैसे आहेत का, असा सवाल शिवसेनेने केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमत्र्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली नाही तर भूकंप होईल.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव येथे उद्धव ठाकरे आज शेतकरी विजयी मेळाव्यासाठी आले आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी गजानन महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बळ आणि सदबुद्धी दे, अशी मागणी केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
उद्धव ठाकरे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले, मध्यावधीला मुख्यमंत्री तयार असल्याचे सांगून कर्जमुक्तीला फाटा देण्याचा तर विचार करत नाहीत ना, अशी शंका येत आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मध्यावधीसाठी तुमच्याकडे जो पैसा आहे, तो पैसा शेतकऱ्यांना द्या. त्याचा सातबारा कोरा करा. आमचा पाठिंबा तुम्हाला कायम राहील. त्यासोबतच उद्धव ठाकरे म्हणाले, या सरकारला कर्जमुक्त करण्याची इच्छा नाही. त्यासाठीच ते मध्यावधीची चर्चा करुन कर्जमुक्तीला फाटा देण्याचा प्रयत्न करत आहे.

शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्रीच जर बोलत असतील तर शिवसेनेला आपली भूमिका मांडावी लागेल. पण शेतकरी कर्जमुक्तीसाठी पैसे नाहीत अशावेळी निवडणुकीसाठी पैसे आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्यावधीला तयार असल्याचे म्हटले होते. त्यावर गुरुवारी शिवसेनेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खासदार राऊत म्हणाले, मुख्यमंत्री जे बोलत असतील ती सरकारची भूमिका असेल तर युती कधीही तुटू शकते अशी परिस्थिती आहे. राऊत यांनी, मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट ही सरकारची भूमिका असण्याची शक्यता फेटाळली आहे. ते म्हणाले, मला असे वाटते की ती मुख्यमंत्र्यांची भूमिका नाही. मुख्यमंत्री कार्यालयातून जर कोणी बोलले असेल तर ती भूमिका सरकारची की मुख्यमंत्र्यांची हे कोण सांगेल…? त्यासोबतच राऊत म्हणाले, प्रत्यक्ष मुख्यमंत्रीच बोलत असतील तर त्याच्यावर शिवसेनेची भूमिका आम्हाला मांडावी लागेल.