ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अमित शाह मुंबईत दाखल, विमानतळावर शक्तीप्रदर्शन

मुंबई, दि. १६ - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं मुंबईत आगमन झालं आहे. मुंबई विमानतळावर अमित शाह यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि राज पुरोहित हे शाह यांच्या स्वागतासाठी हजर होते. अमित शाह तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिवसांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

दरम्यान, अमित शाह विमानतळहून दादरच्या चैत्यभूमीला रवाना झाले. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिल्यानंतर, शिवाजी पार्कवरील वीर सावरकरांच्या पुतळ्याला अमित शाहांनी अभिवादन केलं.

या दौऱ्यात सर्वांच्या नजरा अमित शाह आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर असणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये मातोश्रीवर चर्चा होणार आहे.

गेल्या दोन्ही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने एनडीएत असूनही यूपीएच्या उमेदवाराला मतं दिली होती. त्यामुळे अमित शाह हे स्वतः उद्धव ठाकरेंची भेट घेऊन एनडीएला पाठिंबा देण्यासाठी आवाहन करणार असल्याचं समजतं.