ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

शिवसेनेकडून पीक कर्जासाठी काढलेल्या शासन निर्णयाची होळी

बुलडाणा, दि. १९ - सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या शासन निर्णयात जाचक अटी घालण्यात आल्या असून एकाही शेतकऱ्यांचे कर्ज शासनाच्या निर्णयामुळे माफ होणार नाही, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. पीक कर्जासाठी काढलेल्या शासन निर्णयाची शिवसेनेकडून कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या खामगावातील उपविभागीय कार्यालसमोर होळी करण्यात आली.

शेतकऱ्यांना पीककर्ज माफ होईपर्यंत खरीपाच्या पेरणीसाठी १० हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांकडून शपथपत्र भरून घेण्यासंदर्भात शासनाने अध्यादेश काढला. तो अध्यादेश शेतकऱ्यांना जिवे मारणारा असल्यामुळे बळीराजाला पेरणीसाठी १० हजार रुपयेही मिळणार नाही, असा आरोपही शिवसेनेने केला. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.