ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दोन कट्टर विरोधक येणार एकाच व्यासपीठावर

मुंबई, दि. २१ - ब-याचवर्षांनी एकत्र एकाच व्यासपीठावर राजकारणात परस्परांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे येण्याचा योग जुळून आला असून २३ जूनला सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. हे दोन्ही नेते यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर येऊ शकतात.

शिवसेनेचे आमदार सिंधुदुर्गात आहेत तसेच सत्तेत शिवसेना भाजपसोबत सहभागी असल्याने या भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्धव यांना आमंत्रण आहे. राणे यांचे सुपूत्र नितेश राणे कणकवलीचे आमदार आहेत तर, नारायण राणे विधानपरिषदेचे आमदार असल्यामुळे राजशिष्टाचारानुसार या कार्यक्रमाचे त्यांनाही निमंत्रण आहे. नारायण राणेंना २००५साली शिवसेनेतून बाहेर काढल्यानंतर उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंमध्ये प्रचंड संघर्ष झाला होता.

त्यावेळी नारायण राणेंसोबत काही आमदार, स्थानिक शिवसैनिक बाहेर पडले होते. त्यावेळी राणेंनी शिवसेनेला अनेक धक्के दिले होते. २००५साली मालवणात झालेली पोटनिवडणूक प्रचंड गाजली होती. राणेंनी त्यावेळी माझ्यासमोर उभे राहणा-या शिवसेनेच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असा दावा केला होता. त्यानुसार शिवसेना उमेदवार परशुराम उपरकर यांचा दारुण पराभव झाला होता. शिवसेनेला आपले डिपॉझिटही वाचवता आले नव्हते. त्यानंतर सिंधुदुर्गातून जवळपास शिवसेनेचे अस्तित्वच संपुष्टात आले होते.