ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

कर्जमाफी फॅशन झाली, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडूयांचे वादग्रस्त विधान

मुंबई, दि. २२ - कर्जमाफी आता फॅशन झाली आहे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. परिस्थिती अतिशय बिकट असेल, तरच कर्जमाफी द्यायला हवी. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हा काही अंतिम उपाय नसल्याचेही ते म्हणाले

राज्यासह देशभरात सध्या शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी करण्यात येते आहे. कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. या पार्श्वभूमीवर ते मुंबईत बोलत होते. महाराष्ट्र सह मध्य प्रदेश, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेशमध्येदेखील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली होती. यातील कर्नाटक, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील राज्य सरकारांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीआधी भाजपने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे भाजपला उत्तर प्रदेशात सत्ता हस्तगत करण्यात यश आले. सत्ता हाती येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांचे लाखांपर्यंतचे कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भाजपशासित राज्यांसोबतच इतर राज्यांमधील शेतकऱ्यांनीही कर्जमाफीची मागणी केली. यानंतर महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब या राज्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला.