ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मोदी सरकार काँग्रेसच्या १५ नेत्यांच्या सुरक्षेत करणार कपात

नवी दिल्ली, दि. २३ (वृत्तसंस्था) - एकूण ४२ राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सुरक्षेत केंद्रीय गृहमंत्रालयाने कपात केली असून काँग्रेसच्या १५ नेत्यांचा त्यात समावेश आहे. काँग्रेस नेते अजय माकन, गुजरात काँग्रेसचे नेते अर्जुन मोढवाडिया, शशी थरुर, श्रीप्रकाश जयस्वाल यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. माजी संरक्षण मंत्री . के. अँटनी यांना वाय (-) दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून सुरक्षेसंदर्भात आढावा घेतल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या १५ नेत्यांबरोबरच राज्यसभेचे खासदार राजीव शुक्ला यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर काँग्रेसच्याच गिरिजा व्यास, प्रिया रंजन दासमुन्शी आणि आरपीएन सिंह यांच्यासह आठ नेत्यांची एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे.

केंद्र सरकारकडून प्रतिष्ठित व्यक्ती अथवा एखाद्या राजकीय नेत्याच्या जीवाला धोका असल्यास त्याला सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येते. याबाबत संबंधित व्यक्ती सरकारकडे अर्ज करतात. सरकारकडून त्यानंतर गुप्तचर यंत्रणांकडून आढावा घेऊन खरोखरच या व्यक्तींच्या सुरक्षेला धोका आहे का याची खात्री करून घेतली जाते. धोका असल्यास त्यांना सुरक्षा दिली जाते. कोणत्या व्यक्तीला कोणत्या दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली जावी, याचा निर्णय गृह सचिव, महासंचालक आणि मुख्य सचिव यांची समिती घेते. पोलिसांसह एसपीजी, एनएसजी, आयटीबीपी, सीआरपीएफ, सीआएसएफ आदी सुरक्षा यंत्रणांकडून व्हीआयपी, व्हीव्हीआयपी सुरक्षा कवच दिलं जातं. विशेष व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी एनएसजीच्या जवानांवर असते.