ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

देशाचा विकास हिंदीशिवाय होऊ शकत नाही – वेंक्कया नायडू

अहमदाबाद, दि. २४ (वृत्तसंस्था) - केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी देशभरात हिंदीविरोधी वातावरण निर्माण झालेले असताना हिंदी ही राष्ट्रीय भाषा असून हिंदी भाषेशिवाय भारताचा विकास होऊ शकत नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

याबाबत नायडू म्हणाले, आपली राष्ट्रीय भाषा हिंदी असून भारताचा विकास हिंदीशिवाय होणे अशक् आहे. सध्या सर्वजण इंग्रजी माध्यमाच्या मागे लागले आहेत, हे दुर्दैव आहे. मी ब्रिटिशांच्याविरुद्ध आहे. मात्र त्यांच्या भाषेच्याविरुद्ध नाही. सर्व भाषा आपण शिकायला हव्यात. पण इंग्रजी भाषा शिकल्यानंतर आपली मानसिकता बदलते. हे चुकीचे असून ते देशहिताच्या विरुद्ध आहे. देशातील बहुतेक नागरिक हिंदी भाषेत बोलतात. त्यामुळे हिंदी भाषा शिकणे महत्वाचे आहे. मात्र त्यापूर्वी आपण आपली मातृभाषा शिकणेही महत्वाचे आहे.

हिंदी भाषेला नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विशेषत: दक्षिणेकडील राज्यांतून विशेष विरोध होत आहे. बंगळूरमधील मेट्रो रेल्वेतील फलकांवर करण्यात आलेल्या हिंदी भाषेच्या वापराविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत. तर तमिळनाडूतील रस्त्यांवरील फलकांवर करण्यात आलेल्या हिंदी भाषेचा वापरालाही तीव्र विरोध करण्यात येत आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत हिंदी भाषा लादण्यात येत असल्याचा आरोप काही राजकीय पक्षांनी केला आहे.