ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अभ्यासगट नेमावा - उद्धव ठाकरे

औरंगाबाद, दि. २६ - मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या निर्णयावर समाधानी आहे. मात्र नगर आणि नाशिकमधील शेतकरी अजूनही नाराज आहे. आता सरकारने कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अभ्यासगट नेमावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सोमवारी औरंगाबादमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी कर्जमाफीच्या निर्णयावर समाधानी असून मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासाही मिळाला. पण रविवारच्या दौऱ्यातून अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकरी अजूनही असमाधानी असल्याचे जाणवले असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. सरकारने कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक अभ्यासगट नेमावा. मंत्र्यांचादेखील यामध्ये समावेश असावा आणि हा अभ्यासगट फक्त गृहपाठ करणार नाही असा टोला त्यांनी लगावला.

कर्जमाफी शेतकरी आणि शिवसेना एकत्र आल्यानेच मिळाली. कर्जमाफीचे श्रेय आम्हाला नको. पण कर्जमाफी फॅशन वाटणाऱ्यांकडून आम्ही कर्जमाफी करवून घेतली असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावे अशी मागणीही त्यांनी केली. दुष्काळानंतर गेल्या वर्षी दमदार पावसाने हजेरी लावली. पण मग सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.