ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

घाईगडबडीने जीएसटीची अंमलबजावणी - राहुल गांधी

नवी दिल्ली, दि. १ (वृत्तसंस्था) - आजपासून लागू झालेल्या वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संदर्भात संसदेत मध्यरात्री एका खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते आहे. काँग्रेस पक्षाने या सोहळ्यावर बहिष्कार घातल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आता केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

स्वत:च्या अशा संसदेच्या काही परंपरा आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केवळ तीनवेळाच मध्यरात्री सोहळा आयोजित करण्यात आला होता. जीएसटीच्या अंमलबजावणी सोहळ्याला सरकारने एखाद्या उत्सवाचे रूप दिले आहे. जीएसटी ही एक केवळ कर प्रणाली आहे त्यासाठी इतका भव्य उत्सव करण्याची गरज नव्हती. भाजप सरकार यातून स्वत:चा प्रचार करत आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल यांनी हल्ला चढवला.

सुरुवातीपासूनच काँग्रेस जीएसटीच्या समर्थनात आहे. पण नोटाबंदीप्रमाणेच जीएसटीचीसुद्धा अत्यंत घाई गडबडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. जीएसटीची अंमलबजावणी कोणतीही दूरदृष्टी ठेवता केली जात आहे. जीएसटीमध्ये सुधारणा करण्याच्या अनेक संधी आहेत. पण भाजप सरकारकडून तरीही त्याची घाईगडबडीने अंमलबजावणी केली जात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.