ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पीएसआयने पत्नीची गळा दाबून हत्या करून मृतदेह जंगलात पुरला

गडचिरोली, दि. ५ (प्रतिनिधी) - दुसरे लग्‍न केल्‍यानंतर पहिल्‍या लग्‍नाबाबत कुणाला माहिती होऊ नये म्‍हणून एका पीएसआयने पत्नीची गळा दाबून हत्या केली व पत्‍नीचा मृतदेह जंगलात पुरून ठेवला. या पीएसआयला पोलिसांनी अटक केली आहे. पत्‍नीच्‍या मृतदेहाचे अवशेषही पोलिसांनी शोधून काढले आहेत.

अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यात असलेल्‍या शिराळा येथील रहिवासी अविनाश तांगड हा पीएसआय म्‍हणुन अहेरीत कार्यरत होता. सप्‍टेबर २०१४ मध्‍ये त्‍याने अॅसेन्‍था पिल्‍लई या तरूणीशी मंदिरात प्रेमविवाह केला. त्‍याने ही बाब घरीही सांगितली नव्‍हती. त्यानंतर घरच्यांच्या इच्‍छेप्रमाणे त्‍याचे दुसरे  लग्‍नही झाले.

दुसरी पत्नी घरी आली तेव्हा आधीची पत्‍नी अॅसेन्‍था वडिलांना भेटायला अहमदनगरला गेली होती. २० फेब्रुवारीला ती परत आली, तेव्हा अविनाशने तिला दुसऱ्या खोलीत ठेवले. या दोघींना परस्परांबद्दल माहिती मिळू नये यासाठी अविनाश प्रयत्न करत होता. माञ काही दिवसातच त्‍याचे हे बिंग फुटले. या दोन पत्‍नींमध्‍ये जोरदार वादही झाला.

२४ फेब्रुवारीला अविनाशने अॅसेन्‍थाची गळा दाबून हत्‍या केली. तिच्‍या मृतदेहाची विल्‍हेवाट लावली. दरम्यान त्याची औरंगाबाद जिल्हयात बदली झाली होती. तो करमाड पोलिस ठाण्यात असताना मृतक अॅसेन्‍थाच्या बहिणीने चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. बहीण बेपत्ता असल्याची तक्रार अॅसेन्‍थाच्या बहिणीने केली होती. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता खरा प्रकार उघड झाला.