ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

बसमध्ये भाजप नेत्याच्या कामलीला, बलात्काराचा गुन्हा दाखल

गडचिरोली, दि. ४ - भाजप नेत्याविरोधात धावत्या बसमध्ये अश्लिल चाळे केल्याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे नाव रवींद्र बावनथडे असे असून, तो भाजपचा गडचिरोली जिल्हा सरचिटणीस आणि माजी महासचिव आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. रवींद्र बावनथडे हा या व्हिडीओमध्ये चालत्या बसमध्ये एका तरुणीशी लैंगिक चाळे करताना दिसत आहे.

नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून बावनथडेने बलात्कार केल्याचा आरोप, पीडित तरुणीने केला आहे. त्यानंतर चंद्रपुरातील नागभिड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. २७ जूनला नागपूरवरुन नागभिडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून बावनथडे आणि एक तरुणी प्रवास करत होते. त्याने या बसमध्येच तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येते.

हा सर्व प्रकार ट्रॅव्हल्समधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हॉट्सअपवर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये अनेक प्रवासी असूनही, बावनथडे शारीरिक संबंध करत असल्याचे या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. संबंधित तरुणीने व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस स्टेशन गाठून बलात्काराचा खटला तिने दाखल केला. तिने बावनथडेवर नोकरीचे आणि लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी रवींद्र बावनथडे सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.