ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

चक्क भाजपाध्यक्षांच्या गाडीने उडवले गाईला

नवी दिल्ली, दि. ७ (वृत्तसंस्था) - देशभरात सत्ताधारी भाजपने सध्या गोरक्षणाचा मुद्दा लावून धरला असून देशात लोकांना गोसंरक्षणाच्या नावाखाली कथित गोरक्षकांकडून मारहाण करणे, त्यांची हत्या करणे यांसारख्या घटनांमध्ये वाढ होत असून बीजू जनता दलाला (बीजेडी) या पार्श्वभूमीवर गाईवरुन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांवर निशाणा साधण्याची आयती संधीच मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ताफ्यातील कारची गुरुवारी ओडिशामध्ये एका गाईला धडक बसली. या घटनेत गाय जखमी झाली आहे.

बीजेडीचे नेते आणि खासदार तथागत सत्पथी यांनी यावरुन शहा यांना टार्गेट करत म्हटले आहे की, ‘अमित शहा यांच्या ताफ्याने गाईला धडक दिली. गाय वाईट पद्धतीने जखमी झाली आहे. होली काउ. अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी भाजप अध्यक्षांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान याबाबत एका पोलीस अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काल जजपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग वर बंडालो परिसरात घडली. या परिसरातील पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक निरंजन सबर यांनी सांगितले की, गाईला अमित शहा यांच्या ताफ्यातील एक वाहनाची धडक बसली. ही गाय रस्ता ओलांडत असताना हा प्रकार घडला. या गाईदेखील जखमी झाली असून गाडीचेही किरकोळ नुकसान झाले आहे. ज्या कारमध्ये अमित शहा होते ती कार ती घटनास्थळावरुन आधीच पुढील मार्गाकडे रवाना झाली होती.