ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाण्यातून पैशाच्या आरोपाला संजय काकडेंनी दिला दुजोरा

पुणे, दि. २ - महापालिकेच्या चालू अंदाजपत्रकात समान पाणीपुरवठा योजनेसाठी ५०० कोटींची तरतूद असताना तसेच २४ तास पाणीपुरवठ्याचे कोणतेही काम अद्याप सुरु झालेले नाही. मात्र, कर्जरोख्यातून उभारलेल्या दोनशे कोटी रुपयांच्या व्याजाचा भार पुणेकरांवर पडलेला असताना मर्जीतील ठेकेदारांसाठी सत्ताधाऱ्यांच्याबनवा -बनवीचा डाव उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला असला तरी त्याला सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या खासदारानेही दुजोरा दिल्याने आता पक्षीय राजकारणात एकमेकांनापाण्या पाहण्याचे राजकारण पेटले आहे. समान पाणी पुरवठा योजनेतील घोटाळा आता एक हजार कोटीं रुपयांवर पोहोचल्याची चर्चाही सुरु झाली आहे.

समान पाणी पुरवठा योजनेसाठी देशात प्रथमच कर्जरोख्यांचे सेलिब्रेशन करून मोठ्या गाजावाजात २०० कोटी रुपये पालिकेच्या खात्यात जमा करून घेणाऱ्या प्रशासनाला पहिल्याच महिन्यात तब्बल दीड कोटी रुपयांचे व्याज भरावे लागले आहे. त्यात अंदाजपत्रकीय तरतुदीतून १७०० कोटींच्या निविदांसाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली असली तरी सुमारे २८ टक्के चढ्या दराने आलेल्या निविदांमध्येच संगनमताने घोटाळा करण्यात आला आहे; असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याला भाजपचे खासदार संजय काकडे यांनीही दुजोरा दिल्याने प्राथमिक ५०० कोटी रुपयांवर असणारा हा घोटाळा आता एक हजार कोटींपर्यंत पोहचला आहे. सर्वप्रथम माजी उपमहापौर आबा बागुल यांनी हा घोटाळा उघडकीस आणला. त्यानंतर मात्र एक -एक प्रकरणे आता बाहेर पडत आहेत.

यानिमित्ताने भाजपमधील अंतर्गत गटबाजीही उफाळून आली असून पालकमंत्री गिरीष बापट यांना शह देण्यासाठी खासदार संजय काकडे यांच्यासह अन्य गटही सरसावले आहेत. त्यात भाजपच्या चिन्हावर तुम्ही निवडून आले आहेत, त्यामुळे पक्षनिधीसाठी सक्ती करणाऱ्या शहर भाजपविरोधातही भाजपच्या नवख्या नगरसेवकांनी Posted On: 02 August 2017