ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

मोदी संघाशी चर्चा करून देश चालवतात – राहुल गांधी

नवी दिल्ली, दि. ३ (वृत्तसंस्था) - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. लोकसभेत नाही तर आरएसएस सोबत चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देश चालवतात. तसेच मोदी हे केवळ आपल्यामन की बातला देशावर थोपवू पाहत आहेत. पण देशाच्या जनतेचा आवाज ते ऐकून घेत नाहीत. अशा सामान्य लोकांचाही आवाज ऐकला जावा, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले.

असंघटीत क्षेत्रातील लोकांचा आवाज देशासमोर आणण्यासाठी काँग्रेस एका नवीन संघटनेवर काम करत आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ते एक प्रोफेशनल काँग्रेस बनवण्याची तयारी करत आहेत. ज्याद्वारे असंघटीत क्षेत्रातील कामगारांचा आवाज राजकारण्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील. या प्रोफेशनल काँग्रेसची धुरा पक्षाच्या चार वरिष् नेत्यांच्या हाती असणार आहे ज्यामध्ये शशि थरूर, मिलिंद देवडा यांचा समावेश आहे.