ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

खडसेंनीच धरले आपल्या सरकारला धारेवर

मुंबई, दि. ४ - विरोधकांनी सरकारला प्रकाश मेहता आणि राधेश्यम मोपलवार यांच्यावरुन घेरले असतानाच, आता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीही आपल्याच सरकारला धारेवर धरले. मी एमआयडीसीच्या प्रकल्पांबाबत माहिती मागत आहे. मला दोन अधिवेशने उलटून गेली तरी माहिती अद्याप का दिली जात ना? असा सवाल विधानसभेत एकनाथ खडसेंनी सरकारला विचारला.

एकनाथ खडसेंनी यावेळी घोटाळा असल्यानेच माहिती लपवली जात असल्याचा सनसनाटी आरोपही सरकारवर केला आहे. यावर खडसेंना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही दुजोरा दिला आहे.

सरकारने राज्यभरातील जमीन संपादित करण्यासाठी नोटिफिकेशन काढले. शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी घेतल्या. परंतु त्या मोकळ्या केल्या. अशी मोकळे केलेले किती भूखंड आहेत हे मी सभागृहात विचारतो आहे. पण ते याबाबतची माहिती देऊ शकत नाहीत. सभागृहात मला ही माहिती सहा सहा महिने मिळत नाही. माझी विनंती आहे की, ही माहिती आपल्या माध्यमातून मला पुढच्या आठवड्यात मंगळवार-बुधवारी मिळेल का? नाहीतर हे पण अधिवेशन गेले. एक एक वर्ष भांडून भांडून मिळत नसेल तर माहिती शासन का दडवते आगे ? काय लपवत आहात? असे काय त्यात आहे की ते मला माहिती देऊ शकत नाहीत? त्या प्रकरणात फार मोठी अफरातफर झाल्याची शंका असल्यामुळे ही माहिती सभागृहात येत नाही, असा माझा आरोप असल्याचे खडसे म्हणाले.