ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अमेठीत राजीव गांधी ट्रस्टला भूखंड मोकळा करण्याचे आदेश

अमेठी, दि. ७ (वृत्तसंस्था) - गांधी कुटुंबाचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या अमेठी जिल्ह्यातील एक भूखंड मोकळा करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला दिले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यामुळे ही कारवाई केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जईस तालुक्यातील रोखा गावातील १,०३६० हेक्टर जमीन तत्काळ रिकामी करा, असे प्रशासनाने ट्रस्टला सांगितले आहे. या ठिकाणी ट्रस्टच्या मार्फत बचत गटांच्या लोकांना प्रशिक्षण देण्यात येते.

आधी हा भूखंड एका व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राच्या नावावर नोंदलेला होता, मात्र नंतर राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टने त्यावर कब्जा केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री असलेल्या इराणी यांनी २०१४ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात निव्हडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा या भूखंडाच्या मालकीचा मुद्दा उपस्थित केला होता. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाच्या सरकारने इराणी यांच्या या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले होते.

योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रशासनाने इराणी यांच्या पत्राची दखल घेतली. याबाबत बचत गटाच्या वतीने न्यायालयात दाद मागण्यात आली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. गेल्या आठवड्यात भूखंड मोकळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आमचे लोकप्रिय नेता राहुल गांधी यांच्या विरोधात निव्हडणूक हरलेल्या इराणी यांच्या कुहेतूचा हा परिणाम आहे, असे अमेठीचे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.