ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

काँग्रेसमध्ये जाणार शरद यादव

नवी दिल्ली, दि. ९ (वृत्तसंस्था) - भाजपशी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हातमिळवणी केल्यापासून नाराज असलेले संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते शरद यादव यांनी आज केलेल्या ट्विटमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या गुजरात राज्यसभा निवडणुकीत काल विजय मिळवला होता. भाजपसाठी पटेलांचा हा विजय मोठा धक्का मानला जात आहे. शरद यादव यांनी या पार्श्वभूमीवर ट्विट करून अहमद पटेल यांचे अभिनंदन केले. अहमद पटेल आणि त्यांचा फोटोही यादव यांनी ट्विटसोबत शेअर केला. राज्यसभेच्या निवडणुकीत तुम्ही मोठ्या अडथळ्यांचा सामना करून विजय मिळवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. भावी कारकिर्दीतही तुम्हाला असेच यश मिळो, असा संदेश ट्विटमध्ये लिहला होता. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये जाण्यास शरद यादव उत्सुक असल्याच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.

शरद यादव महाआघाडीला धोबीपछाड देऊन भाजपबरोबर एका रात्रीत हातमिळवणी करण्याच्या नितीशकुमारांच्या निर्णयावर सुरूवातीपासूनच नाराज आहेत. बिहारमध्ये घडलेला प्रकार हा दुर्दैवी असल्यामुळे जनमताचा अनादर झाला. जो निर्णय नितीश कुमार यांनी घेतला त्याच्याशी मी सहमत नाही. हे खूपच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शरद यादव यांनी दिली होती. शरद यादव यांचे निकटवर्तीय आणि दोन वेळा बिहार विधान परिषदेचे आमदार राहिलेले विजय वर्मांनी यादव हे महाआघाडीत कायम राहण्यासाठी नवीन पक्ष स्थापन करतील असे संकेत दिले होते. पण हा दावा शरद यादव यांनी फेटाळून लावला होता. पण त्यांच्या आजच्या ट्विटने पुन्हा एकदा नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चेला Posted On: 09 August 2017