ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

आता मी कोणालाच घाबरत नाही – शरद यादव

मुझफ्फरपुर, दि. १२ (वृत्तसंस्था) - आपल्याविरोधात कारवाई करण्याची दिलेली धमकी जदयूचे वरिष्ठ नेते शरद यादव यांनी फेटाळून लावली आहे. शरद यादव बिहारमधील महाआघाडी तोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी आपली ही नाराजी उघड केली असून, नितीश कुमार यांच्यावर टीकाही केली आहे. दरम्यान जदयूमधील काही नेते शरद यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत असल्याच्या वृत्तावर बोलताना, आपण माजी पंतप्रधान इंदिर गांधींच्या विरोधातही उभे राहिलो होतो, आणि आता कोणालाच घाबरत नाही असे सांगितले आहे.

याबाबत बोलताना जदयूचे संसदीय नेते शरद यादव यांनी म्हटले आहे की, मला घाबरवण्याचा काही नेते प्रयत्न करत आहेत. इंदिरा गांधींचाही मी घाबरता सामना केला आहे. मग मला घाबरवणारे हे कोण ? शरद यादव यांनी राज्यात नितीश कुमार यांच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी आणि विरोध लोकांसमोर मांडण्यासाठी संवाद यात्रा काढली असून लोकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आपल्यामध्ये आणि नितीश कुमार यांच्यात पुन्हा सगळे नीट होण्याची कोणतीच शक्यता नसल्याचे शरद यादव यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. नितीश कुमार यांचा भाजपासोबत जाण्याचा निर्णय अयोग्य ठरवत लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप याआधीच शरद यादव यांनी केला आहे.