ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दुष्काळी गावांच्या यादीत बुलढाण्यातील १४२० गावांचा समावेश

मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी) - राज्यातील दुष्काळी गावांच्या यादीत शनिवारी १४२० गावांचा नव्याने समावेश करण्यात आला. ही सर्व गावे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. 

याशिवाय, पुढील आठ दिवसांत केंद्रीय पथकाकडून पुन्हा एकदा राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी केंद्र सरकारच्या सुधारित नियमानुसार अपुऱ्या पावसाचा फटका बसलेल्या राज्यातील १४,७०८ गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. 

त्यानंतर या सर्व गावांमध्ये दुष्काळासाठीच्या उपाययोजना आणि सवलतींची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये ३३.५ टक्के सवलत, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ, जमीन महसूलात सूट, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्स सुरू करणे तसेच आणि शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडीत न करणे अशा निर्णयांचा समावेश आहे.