ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राष्ट्रध्वज वंदनावरून राहुल गांधींनी डागली संघावर तोफ

नवी दिल्ली, दि. १७ (वृत्तसंस्था) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रध्वज वंदन हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हा मुद्दा उकरून काढल्याने संघाची पुन्हा कोंडी होते का,  हाच मुद्दा राजकीय वर्तुळात महत्वाचा ठरणार आहे.

देशाची सत्ता हातात येईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कधीही तिरंग्याला वंदन केले नव्हते, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. सत्ता आहे तोपर्यंतच संघातील लोकांची देशाशी बांधिलकी आहे. देशाकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत. एक दृष्टीकोन सांगतो की, हा देश माझा आहे. तर दुसरा दृष्टीकोन असतो की, मी या देशाचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेसमध्ये हाच मुलभूत फरक आहे. हा देश आमचा आहे, तुम्ही या देशाचे नाहीत, ही संघाची विचारसरणी आहे. गुजरातमध्ये दलितांना मारहाण करून संघाने हे दाखवून दिले आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी संघावर अक्षरश: आगपाखड केली. संघाला देशाची घटना बदलून टाकायची आहे, या मुद्द्याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले आहे.