ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

किरीट सोमय्यांच्या रडारवर आता डीएस कुलकर्णी

मुंबई, दि. १९ - पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांनी १२०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. १२०० कोटीचा घोटाळा डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसके ग्रुपने केल्याचा आरोप करत यासंबंधी मुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय आणि पीएफ आयुक्तांकडे सोमय्यांनी तक्रार केली आहे. तसेच यासंबंधी त्यांनी कारवाईची देखील मागणी केली आहे.

२०१५ सालापासून ७५० कर्मचाऱ्यांचा पीएफ डीएसकेंनी जमा केलेला नाही, असा दावाही किरीट सोमय्या यांनी डीएसकेंवर केला आहे. याप्रकरणी सोमय्या यांनी ट्विटही केले आहेत. त्यामुळे डीएसकेंवर आता नेमकी कोणत्या प्रकारची कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.