ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राणेंसाठी महसूल खाते सोडणार चंद्रकांतदादा

मुंबई, दि. २१ - माजी मुख्यमंत्री कॅाग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. त्यांना राज्यात मंत्रिपद मिळणार असल्याचे समजते. राणे यांना महुसुल खाते हवे आहे. तर सध्या महसूल खाते असलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांनापीडब्लूडीची ऑफर दिली आहे. राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलताना पाटील यांनी ही ऑफर स्वतःहून दिली आहे.

पाटील यांच्याकडे महसुलसह सार्वजनिक बांधकाम खातेही आहे. राणेंनी महसूल खाते मागावे, असा सल्ला भाजपच्या काही नेत्यांनी राणे यांना दिला असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या खातेबदलात भाजपमधील अंतर्गत स्पर्धाही असल्याचे उघड झाले आहे. माजी मुख्यमंत्री राणे पक्षात आल्यानंतर त्यांनाही साजेसे खाते द्यावे लागणार आहे. महसूल खाते असलेला क्रमांक दोनचा मंत्री मानला जातो. त्यामुळे राणे हे महसूल मिळण्यासाठी प्रयत्न करतील, यात शंकाच नाही.

राज्यात क्रमांक दोनचे महसूलखाते मानले जाते. चंद्रकांतदादांना ते सोडायचे नाही. बांधकाम खाते देईल पण महसूल सोडणार नाही, असे चंद्रकांतदादांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे. एकथान खडसे यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यानंतर पाटील यांच्याकडे महसूल खाते आले. मनोहर जोशी हे मुख्यमंत्री असताना राणे यांच्याकडे महसूल खाते होते. ते शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये आल्यानंतरही त्यांना महसूल खाते देण्यात आले होते.