ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आमच्यात ढवळाढवळ करू नका, लिंगायत नेत्यांचा सरसंघचालकांना इशारा

हुबळी, दि. २३ (वृत्तसंस्था) - कर्नाटकमध्ये पुढील वर्षी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेमुळे भाजपसाठी अवघड ठरण्याची शक्यता असून सध्या कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. बेळगावमध्ये यासाठी काल मोर्चाही काढण्यात आला होता. त्यावेळी लिंगायत समाजाच्या नेत्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना आमच्या प्रकरणात ढवळाढवळ करू नका, असा थेट संदेश दिला.

काही दिवसांपूर्वी हुबळी येथे लिंगायत समाजातील गुरूंची मोहन भागवत यांनी भेट घेतली होती. त्यावेळी भागवतांनी लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा हट्ट सोडून द्या, असा सल्ला दिल्याचे समजते. माते महादेवी यांनी या पार्श्वभूमीवर बेळगावमधील कालच्या मोर्च्यात भागवत यांना खडे बोल सुनावले. आम्हाला परावृत्त करण्यापेक्षा सरसंघचालकांनी स्वत:चे राजकीय वजन वापरून आमचे म्हणणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवावे. लिंगायत समाजाला जेणेकरून स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. मोहन भागवतांप्रमाणे आम्ही पुराणकालीन मुल्यांना नव्हे तर आधुनिक लोकशाहीच्या मुल्यांना धरून जगत असल्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून सल्ला घेण्याची काडीमात्र गरज नसल्याचे माते महादेवी यांनी म्हटले.