ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

बाबा रहीम यांचा तुरुंगातही ‘राजेशाही थाट’ ?

नवी दिल्ली, दि. २६ (वृत्तसंस्था) - बलात्कार प्रकरणी तुरुंगात असणाऱ्या डेरा सच्चा सौदाचे बाबा राम रहीम यांना व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचे दिल्याचे वृत्त असून तुरुंगातील एसी खोलीत बाबा राम रहीम सिंग यांना ठेवण्यात आले आणि त्यांना एक मदतनीस देण्यात आला असे वृत्त इतर प्रसारमाध्यमांनी दिले आहे. पण हे आरोप तुरुंग प्रशासनाने फेटाळून लावले आहेत.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बाबा राम रहीम यांना१५ वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. हेलिकॉप्टरने रोहतकमधील तुरुंगात बाबा राम रहीमला नेण्यात आले. हेलिकॉप्टरने बलात्कार प्रकरणातील दोषीला तुरुंगात नेल्याने आधीच नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी हा निर्णय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घेतला होता. आता तुरुंगातही बाबा राम रहीमला व्हीआयपी सुविधा मिळत असल्याचे वृत्त आहे. तुरुंगात राम रहीमला एसी खोलीत ठेवण्यात आल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. खोलीत वॉटर प्यूरिफायर असून राम रहीम यांच्या मदतीसाठी एक सहाय्यकदेखील देण्यात आल्याचे समजते.

कारागृह विभागाचे महासंचालक के पी सिंग यांनी बाबा राम रहीम यांना व्हीआयपी सुविधा मिळत असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमच्यासाठी बाबा राम रहीम हा देखील सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच एक कैदी आहे. ते सरकारी अतिथी गृहात नसून तुरुंगात आहेत. त्यांना एसी खोली देण्यात आलेली नाही, तसेच त्यांच्या मदतीसाठी सहाय्यकदेखील दिलेला नाही असे त्यांनी सांगितले.