ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

राम रहीमसारख्या भोंदूंचा फडणवीसांसारखे नेते प्रचार करतात हे दुर्दैवच - कडू

बुलडाणा, दि. २ - स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी चमत्कार नावाच्या गोष्टीवर कधीच विश्वास ठेवला नाही. पण राम रहीमसारख्या भोंदूंचा चमत्कारापोटी जिवंत माणसांना देव मानणारे मोदी, फडणवीस, चव्हाणांसारखे नेते मंडळीच प्रचार करतात हे दुर्दैव असून या सर्वांना तुरुंगामध्ये टाकायला हवे असे मत प्रहार संघटनेचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

शेगावमध्ये आयोजित दोन दिवसीय दिव्यांग कार्यशाळेसाठी बच्चू कडू आले असता, त्यावेळी स्थानिक विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार कडू पुढे म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पहिल्याच दिवशी सत्यसाईबाबा यांच्यासाठी जेवण ठेवले. सचिन तेंडुलकर आपले शतक सत्यसाईबाबांच्या नावे करतो, तर नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे राम रहीमसारख्या बाबांच्या सत्कारासाठी जातात. हा अल्पबुद्धितील प्रकार आहे. या सर्व बाबांच्या भोंदूगिरीला त्यांना राजकीय आश्रय देणारी मंडळीही तेवढीच जबाबदार आहेत.

याबाबत राजकीय मंडळींनी पथ्य पाळायला हवे. माझा थेट मोदी आणि फडणवीसांना राम रहीमबाबत प्रश्न आहे की, तुम्ही काय पाहून यांच्याकडे गेले? काय म्हणून त्यांचा सत्कार केला? आपण एका जबाबदार पदावर असल्याने कुठे जावे याचे तारतम्य असायला पाहिजे. त्यांच्या या भूमिकेचा मी निषेध करतो, असे आमदार कडू म्हणाले.