ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पक्षाच्या विरोधातील गद्दारांना माफी नाही - राहुल गांधी

अहमदाबाद, दि. ४ (वृत्तसंस्था) - पक्षात राहून पक्षाच्या विरोधात कारवाया करणाऱ्या गद्दारांना कोणत्याही परिस्थितीत माफी देण्यात येणार नसल्याचा इशारा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. केवळ भारतीय जनता पक्ष आणि त्याची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात ठामपणे काम करणाऱ्या व्यक्तींनाच गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली जाईल; असेही राहुल यांनी सुनावले आहे.

राहुल गांधी यांनी अहमदाबाद येथे जाहीर सभा घेऊन गुजरातच्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी बोलताना राहुल यांनी पक्षातील घरभेद्यांना सज्जड डाँ दिला. पक्षात राहून पक्षाच्या पराभवाची पायाभरणी करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. जे स्थानिक पातळीवरील जनतेच्या संपर्कात राहून भाजप आणि आरएसएसच्या विरोधात प्रभावीपणे काम करीत आहेत; अशांनाच या निवडणुकीत पक्षाची उमेदवारी दिली जाईल. पक्षातील गद्दार आणि आयात उमेदवारांना या निवडणुकीत तिकीट मिळणार नाही; असे राहुल यांनी सांगितले.

या सभेत केलेल्या भाषणात राहुल यांनी प्रसारमाध्यमांवरही तोफ डागली. प्रसारमाध्यमे ही छोटे व्यावसायिक अथवा शेतकरी चालवीत नाहीत; तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे दोन-चार बगलबच्च्चे चालवितात; अशी टीका त्यांनी केली. माध्यमातील काही लोक मोदींच्या विरोधात लिहू इच्छितात. मात्र सध्याचा जमाना दडपशाहीचा आहे. या काळात सरकार आणि पंतप्रधानांच्या विरोधात लिहिणाऱ्यांवर दडपशाही केली जाते. प्रसंगी त्यांना धमकावले आणि झोपले जाते; असा आरोपही राहुल यांनी केला.

राहुल गांधी यांच्या या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या सभेत एखाद्या राजकीय नेत्याप्रमाणे माईकसमोर उभे राहून भाषण करता एखाद्या व्यावसायिक प्रशिक्षकाप्रमाणे अथवा प्रेरक वक्त्याप्रमाणे इंग्रजी अक्षर टी आकाराच्या स्टेजवर हातात माईक घेऊन फिरताना आपले भाषण केले. या सभेनंतर राहुल अहमदाबादमधील व्यावसायिक, छोटे व्यापारी, प्रदेश काँग्रेस प्रदाधिकारी यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली.