ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आत्मचरित्रातून गौप्यस्फोट करणार नारायण राणे

मुंबई, दि. ७ - सध्या आत्मचरित्र लिहिण्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे व्यस्त असून त्यांनी हे पुस्तक लिहिण्यास काही दिवसांपूर्वीच सुरुवात केली आहे.

राणे रोज सकाळी दीड ते दोन तास लेखन करतात. पुढच्या वर्षी १० एप्रिलला वाढदिवशी प्रकाशन करण्याचा राणेंचा मानस आहे. राणेंच्या बालपणापासून तर आतापर्यंतच्या अनेक घडामोंडींचा वेध राणे या आत्मचरित्रात स्वतः घेणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असतानाच्या अनेक घडामोडींचे गौप्यस्फोट या पुस्तकातून होण्याची शक्यता आहे.

राजकारणातील व्यक्तीला सर्वच सत्य उघड करता येत नसले तरी आत्मचरित्रात वास्तवाशी जास्तीतजास्त प्रामाणिक राहण्याचा राणेंचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता या आत्मचरित्राकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.