ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अन् बिहार काँग्रेस अध्यक्ष रडू लागले…

बिहार, दि. ८ (वृत्तसंस्था) - काँग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळलेल्या पक्षाच्या राज्य अध्यक्षांवर रडण्याची पाळी आली आहे. एका प्रादेशिक वृत्त वाहिनीशी बोलताना बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अशोक चौधरी यांचे अश्रू समोर आले.

मी पक्षाची खूप सेवा केली आहे, परंतु मला माझ्या निष्ठेचे बक्षीस मिळण्याऐवजी पदावरून हटविण्यासाठी खेळ खेळण्यात येत आहे. यात काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे,” असे म्हणून डॉ. अशोक चौधरी रडताना प्रेक्षकांना दिसले. त्यांच्या या रडवेल्या चेहऱ्याची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत.

काँग्रेसशी संबंधित सूत्रांनुसार डॉ. अशोक चौधरी हे राष्ट्रीय नेतृत्वावर नाराज आहेत. “मी काँग्रेसमध्ये आलो तेव्हा माझे वय केवळ 25 वर्षांचे होते. तेव्हापासून मी पक्षाची सेवा करत आहे. गेल्यावर्षांपासून मी काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी काम करत आहे. तरीही पक्षाचे नेतृत्व माझ्यावर शंका घेतात, ” असे डॉ. चौधरी म्हणाले.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यापासून काँग्रेसमध्ये लाथाळ्या सुरू झाल्या आहेत. पक्षाचे १४ आमदार स्वतःचा पक्ष काढणार आहेत, अशीही चर्चा आहे. बिहारमध्ये पक्षाचे एकूण २७ आमदार आहेत.