ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अमरावतीत मुख्याध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

अमरावती, दि. ७ (प्रतिनिधी) - मुख्याध्यापकाने स्टाफ क्वार्टरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना चिखलदरा तालुक्यातील सिमाडोह शाळेत उघकीस आली.

विजय नकाशे, असे आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. पंचायत राज समितीच्या पथकाने नुकतीच शाळेला भेट दिली होती. यावेळी नकाशे यांच्या कामात त्रुटी असल्याचा आरोप पथकाने केला होता. या आरोपांमुळे नकाशे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, शाळेच्या कामात अनियमितता आढळून आल्याने चौकशीची सूचना देण्यात आल्याची माहिती पंचायत राज समितीचे अध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.