ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

कौशल्यविकासाद्वारे मागासवर्गीय युवकांना रोजगाराची संधी द्या - राजकुमार बडोले

जळगाव, दि. ९ (प्रतिनिधी) - मागासवर्गीय घटकातील युवकांना कौशल्यविकास कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षीत करा व त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्या, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी अधिकाऱ्यांना दिले.

येथील अजिंठा विश्रामगृहावर आयोजित नाशिक विभागीय आढावा बैठकीत श्री. बडोले बोलत होते. बैठकीला आमदार स्मिताताई वाघ, आमदार गुरुमुख जगवाणी, सामाजिक न्याय विभागाचे विभागीय आयुक्त के.एन. गवळे, जातपडताळणी समितीचे संशोधन अधिकारी प्रशांत चव्हाण, सहाय्यक आयुक्त राकेश पाटील, वैशाली हिंगे, वंदना कोचुरे, राकेश महाजन आदी उपस्थित होते.

श्री. बडोले यांनी जिल्हानिहाय व योजनानिहाय आढावा घेतला. त्यात ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रक्रियेतील विविध टप्प्यांचे सुलभीकरण करुन विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच वसतीगृह प्रवेश प्रक्रियेसंदर्भात योग्य ती पावले उचलण्यात येतील. ज्याठिकाणी विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशासाठी जास्त संख्येने येतात त्याठिकाणी नवीन वसतीगृहे उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.

लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा म्हणून महामंडळांनी आपल्या कर्जवाटप योजनांची शिबीरे गावपातळीवर घ्यावीत व लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचा लाभ द्यावा. सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजनांचे निकष, स्वरुप, लाभार्थ्यांच्या निवडीचे निकष हे जुने झाले असून नवीन परिस्थितीनुसार त्यात सुसंगतता यावी यासाठी सर्व योजनांच्या निकषांच्या पुनर्रचनेसंदर्भात यशदा येथे अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करावी, अशी सुचनाही त्यांनी केली.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमाचा आधार घेणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व विदेशात शिक्षणाला जाण्यासाठी प्रवेश परिक्षांसाठी पूर्वतयारीबाबत मार्गदर्शन करणे यासंदर्भात विशेष प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावेत, अशी सुचनाही श्री. बडोले यांनी केली. सूत्रसंचालन प्रशांत चव्हाण यांनी केले.