ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

...तर मी बंडखोर - शत्रुघ्न सिन्हा

नागपूर, दि. १६ (प्रतिनिधी) - ‘खऱ्याला खरे म्हणणे ही जर बंडाळी असेल, तर मी बंडखोर आहे,’ असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे.  नागपुरात रविवारी एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.

बिहार निवडणुकीच्यावेळी डाळीचे वाढलेले दर कमी करा, पक्षातील ज्येष्ठांचा सन्मान करा आणि बिहारी आणि बाहरी हा मुद्दा निकाली काढा, असे म्हणालो. नेतृत्त्वाने याकडे लक्ष दिले असते तर लाभ झाला असता, परंतु प्रचारासाठी दुरून नेते आयात करण्यात आले. बराच पैसा, ऊर्जा खर्च केली. 

दिल्लीतही असेच घडले होते. आम्ही यातून काही धडा शिकणार आहोत की नाही? बिहारमधील पराभव हा पक्षाचा शेवटचा पराभव ठरला पाहिजे, असे मला वाटते. यात गैर काय आहे? पक्ष आणि जनहिताच्या गोष्टी बोलणे चुकीचे आहे काय? आता पक्षातील ज्येष्ठ बोलू लागले आहेत.